top of page
shoumika mahadik.jpg

ताराराणींच्या लेकी आम्ही
नवा इतिहास घडवू...!

ABOUT ME

Our Mission

सामाजिक कार्य करण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. ते मन निसर्गतःच आम्हा स्त्रियांना लाभलेलं आहे. मात्र आजवर चौकटीच्या आत बंदिस्त करून ठेवल्या गेलेल्या व सामाजिक क्षेत्रात स्वयंभू व्हायला संधी नाकारलेल्या स्त्रियांना याच चौकटीला धडका देवून आपल्यासह समाजाच्या प्रगतीची दारे किलकिली करण्याचे सामर्थ्य निर्माण व्हावे, यासाठी मी प्रयत्नशील आहे. कारण स्त्रियांना संधी मिळाली तर त्या त्याचे सोने करून त्याचा उपयोग इतरांच्या फायद्यासाठी करतात. हे आजवर आपण पाहिले आहे. महाराणी ताराराणींचा इतिहास लाभलेल्या या माझ्या कोल्हापूर जिल्ह्याने स्त्रियांच्या सक्षमीकरणातून समाजहित साधण्याचा जो आदर्श घालून दिला आहे, त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत.

आजही समाजाकडे पाहत असताना कितीतरी उणिवा असल्याच्या जाणवतात. हाच समाज अधिक सक्षम, सजग, समृद्ध आणि स्वयंपुर्ण व्हावा, यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेची अध्यक्षा म्हणून कार्यरत असताना संपुर्ण जिल्ह्यात विकासाचा नवा पॅटर्न राबविण्यासाठी मी वेगवेगळे प्रयोग केले. याहीपुढे लोकप्रतिनिधी म्हणून सर्व घटकांना सोबत घेऊन त्यांच्या विकासासाठी अविरत प्रयत्न करणे, हाच माझा उद्देश आहे.

अनेक महिला सध्या चार भिंतींचा उंबरठा ओलांडून "आत्मनिर्भर' बनण्यासाठी बाहेर पडल्या आहेत. काही जणी नोकरी करतात तर काहीजणी स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भरतेकडे पाऊले टाकताहेत. त्यांना आर्थिक, मानसिक, शारिरीकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्या पाठिशी मी नेहमी उभी राहीन. त्यासोबतच अजूनही ज्या महिलांना "आत्मनिर्भरते'कडे वाटचाल करायची आहे, त्यांच्यासाठीही विविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे.

महिलांना स्वतःची ओळख निर्माण करता यावी व त्यासाठी विविध संधी देण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी समजावून घेण्यासाठी, त्यावर शासनस्तरावर उपाययोजना करण्यासाठी हवे ते प्रयत्न करण्याची माझी तयारी आहे.

युवती, मुलीही सध्या शिक्षणासोबत स्वतःची ओळख करून घेण्यासाठी जग धुंडाळत आहेत. त्यांनाही समाजातील काही अनिष्ट प्रवृत्तींकडून त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. हे थांबविण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे. त्यांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या ऐकून घेण्यासाठी माझे दरवाजे नेहमी खुले असतील.

येणाऱ्या काळातील कोल्हापूरचा सर्वांगीण विकास व्हावा, मुलभुत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, पायाभूत सुविधांना प्राधान्य मिळावे, यासाठी मी नेहमीच तत्पर आहे. हे ध्येय पूर्ण करण्यात आपल्या सर्वांचीच साथ माझ्यासाठी मोलाची आहे.

Articles

FOLLOW SHOUMIKA MAHADIK ON SOCIAL MEDIA

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
bottom of page