top of page

ABOUT ME

*Member of District council, Kolhapur

*District President at BJP Mahila Morcha

*Ex-President of Kolhapur ZP.

*Director at : Gokul - Kolhapur Zilla Sahakari Dudh Utpadak Sangh Ltd.

QEKKGI0G.jpg

मा. अध्यक्षा सौ. शौमिका अमल महाडिक यांचे कार्यकाळात मिळालेले पुरस्कार व महत्त्वाची कार्ये

१) दि. २३/१०/१९ रोजी केंद्र शासनाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार २०१९ मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेला दिल्ली येथे प्रथम क्रमांक देऊन गौरवण्यात आले.

२) दि. २४/०६/१९ रोजी माहे जानेवारी २०१९ मध्ये देश पातळीवरील घेण्यात आलेल्या ' स्वच्छ सुंदर शौचालय ' स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा परिषदेने देशात द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल जलशक्ती मंत्रालयाचे मा. केंद्रीय मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत यांचे हस्ते देशाची राजधानी नवी दिल्ली येथे मा. अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमन मित्तल यांना पुरस्कार देऊन गौरव करणेत आला.

३) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये नॉन इंटेंसिव प्रकारात राज्यात प्रथम क्रमांक सन २०१८-१९

४) दि. १२/०३/२० रोजी यशवंत पंचायतराज अभियान २०१९ मध्ये उत्कृष्ट काम केलेबद्दल कोल्हापूर जिल्हा परिषदेला राज्यात द्वितीय क्रमांक आला. त्यानिमित्त मा. अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांचा व जिल्हा परिषद आजी माजी पदाधिकारी यांचा मा. राज्यपाल श्री. भगतसिंह कोशारी व मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे तसेच इतर मंत्री महोदयांचे उपस्थितीत सत्कार करून गौरविण्यात आले.

५) यशवंत पंचायतराज अभियानामध्ये पुणे विभागात प्रथम क्रमांक सन २०१७-१८ व राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड

६) पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार अभियानामध्ये राज्यात प्रथम क्रमांक आला असून त्याची तपासणी पूर्ण होऊन राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

७) राष्ट्रीय बायोगॅस योजनेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक

८) जि. प. मार्फत दरवर्षी कर्मचारी/अधिकारी व पदाधिकारी यांचे साठी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

९) नमामी पंचगंगा उपक्रमांतर्गत पंचगंगा नदीकाठच्या गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबविणेत आली व नदीमध्ये मिसळणारे सांडपाणी रोखणेसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांचे प्रबोधन केले.

१०) ' गुढीपाडवा, प्रवेश वाढवा ' अभियानांतर्गत दरवर्षी मोठ्या प्रमाणात उपक्रम केल्याने जि. प. शाळांमध्ये व अंगणवाडीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

११) पंचगंगा नदी प्रदूषण रोखणेसाठी गणेशमूर्ती दान उपक्रमांतर्गत २,६८,१४४ मूर्ती दान व १३६० ट्रॉली निर्माल्य जमा करण्यात आले.

१२) राजर्षी शाहू छत्रपती निवासी क्रीडा प्रशाला ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार शिक्षण, निवास व क्रीडा प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव शाळा जि. प. स्वनिधीतून चालविली जाते.

१३) जिल्हा परिषदेमार्फत नावीन्यपूर्ण योजनेतून दिव्यांग उन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यातील दिव्यांगांचे सर्वेक्षण करणेत येऊन जवळ-जवळ ४५,३२० दिव्यांगांना स्वावलंबन कार्ड देणेत येत आहे. तसेच आवश्यक त्या दिव्यांगांना साहित्य वितरीत करणेत येणार आहे.

bottom of page