नवदुर्गांचा जागर
- Shoumika Mahadik
- Feb 9, 2021
- 1 min read
भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा कोल्हापूरच्यावतीने नवरात्रोत्सवानिमित्त समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या नवदुर्गांचे (महिलांचे) सत्कार केले. तसेच भाजपा कोल्हापूर जिल्हा महिला मोर्चा नवपदाधिकारी नियुक्तीच्या पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा मा. उमाताई खापरे होत्या.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या या आधुनिक नवदुर्गापासून आपण सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे. त्यांचे कार्य खरचं कौतुकास्पद आहे. आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन आजपासून आम्ही जोमाने कामाला सुरुवात केली. नव्या जोमानं पक्षाचा विचार जनतेपर्यंत पोचवण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन मी यावेळी महिला पदाधिकाऱ्यांना केले. यावेळी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
Commentaires