विचारशील, संवेदनशील व संयमी असलेली 'ती'... आत्मनिर्भर, जाणकार आणि खंबीर असलेली 'ती' स्त्रीशक्ती..!
- Shoumika Mahadik
- Mar 28, 2023
- 1 min read
विचारशील, संवेदनशील व संयमी असलेली 'ती' स्त्रीशक्ती..!
आत्मनिर्भर, जाणकार आणि खंबीर असलेली 'ती' स्त्रीशक्ती..!

जिचं आयुष्य चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित होतं, तिने आता घराच्या उंबरठ्यासह मनाचाही उंबरठा ओलांडला. जी स्त्री अनिष्ट रूढी परंपराच्या जाळ्यात अडकली होती, त्या स्त्रीने आता स्वातंत्र्य कमावले. पूर्वी 'सती' जाणारी स्त्री, आता 'राष्ट्रपती' पदापर्यंत जाऊन पोहोचली आहे. कुंकूपासून सुरू झालेला हा स्त्रीत्वाचा प्रवास टिकलीपर्यंत येऊन पोहोचला. या प्रवासात तिच्या संघर्षमय कहाणीला तिच्याच जिद्दीची साथ मिळाली आणि बांगड्यांचे वजन पेलणारे मनगट आता वेळप्रसंगी हातामध्ये समशेरसुद्धा घेऊ लागले.
या साऱ्या कहाणीमध्ये ती आपल्या भूमिकेपासून कधीच दूर गेली नाही. कितीही संकटे आली तरी ती पहाडासारखी उभी राहिली. कितीही वादळे आलीत, तरी तिने त्यावर धाडसाने मात केली. कधी आई, कधी पत्नी, कधी बहीण तर कधी मैत्रीण अशा विविध भूमिका साकारत बेरंग आयुष्यात रंग भरण्याचं काम ती आजही करत आहे.
स्वराज्य उभा करण्याची प्रेरणा असो, किंवा समाजातील अनिष्ट रूढी परंपरांना विरोध करण्याचे धाडस असो, इंग्रजांना 'सळो की पळो' करणारी रणरागिणी असो किंवा आपल्या लेकरांना जीव लावणारी माऊली असो... अपूर्ण आयुष्याला पूर्णत्वाचा आधार देणारी असते ती स्त्री..!
म्हणून तिचा सन्मान करूया... तिच्यातल्या आदिशक्तीचा आदर करूया.
मातृत्वाचा अथांग सागर असणाऱ्या आणि पूर्णत्वाची सावली देणाऱ्या नारीशक्तीस आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा..!
तू नारी
सब पे भारी..!!
留言